Monday, December 7, 2009

परिचर्चा - भारताचा विकास-१ डिसेंबर ०९ -चर्चाबिंदू

परिचर्चा - भारताचा विकास --श्री.दिलिप कुलकर्णी -१ डिसेंबर ०९
चर्चाबिंदू
  • जीवनदृष्टीत बदल त्यानुसार जीवनध्येयात बदल व अंतिंमतः जीवनशैलीत बदल या क्रमाने प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर विचार करावा व स्वतःपासून सुरवात करावी.
  • पाश्चात्य व भारतीय जीवनदृष्टीत मुलभूत फ़रक आहे.
  • शाश्वतता व सर्वहितकारिता ही भारतीय जीवनदृष्टीतील २ तत्वे आहेत.
  • राजकीय यंत्रणा ,योजना आयोग या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.
  • वर्तमान व्यवस्था पर्याय न देताच नष्ट केल्यास अराजकाची परिस्थिती निर्माण होईल.
  • वर्तमान व्यवस्थांना दृष्टी देउन परिवर्तनाकडे वाटचाल करावी लागेल.
  • विकास नियोजनाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे.
  • मोक्ष संकल्पनेवर अधिक भर दिल्यामुळे समृद्धि निर्माण ,भौतिक विकासाकडे दुर्लक्ष झाले असावे का याचे विश्लेषण होण्याची गरज आहे.
  • मोक्ष जीवनध्येय असणार्‍या प्राचीन समाजातही समृद्धीची परंपरा होती.संदर्भ :- अन्नं बहु कुर्वित या CPS ने प्रकाशित पुस्तकात मद्रास प्रांतातील ब्रिटिशपुर्व काळातील अन्नवैपुल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
  • समग्रतेने विचार करता भारतीय़ जीवनदृष्टी केवळ निवृत्तीपर नाही.
  • अमेरिकप्रमाणे जीवनशैली सर्व जगाने जगण्यासाठी साडेपाच पृथ्वींच्या संसाधनांची गरज आहे.
  • बालकांचे व पालकांचे प्रबोधन करण्य़ाची आवश्यकता आहे.
  • वर्तमान शिक्षणातून याबद्दल प्रेरणा मिळत नाही
  • उच्चतमीकरण वा न्युनतमीकरण नको तर इष्टतमीकरण हवे.
  • वर्तमान विकास नमुन्यातून प्राप्त समृद्धी भावी पिढीच्या संसाधनांची लुट करुन होत आहे.
  • व्यक्तीमधील लोभ ह्या प्रवृत्तीला मर्यादा घालणे अवघड आहे.उदा.आंबा-कल्टार,उस पिक
  • आजच्या मॉडेल मधील संघर्षमयतेचे कारण समृद्धीचे विषम वाटप हे आहे.
  • १ पृथ्वीच्या ecological footprint पेक्षा अधिक असेल तर ते अधारणक्षम होय
  • hydrocarbon आधारित अर्थव्यवस्थेला पर्याय म्हणुन hydrogen आधारित अर्थव्यवस्था मांडली जात आहे.
  • पण हा पर्याय थर्मोडायनॅमिक्स च्या सिद्धान्ताच्या विरोधी आहे.
  • सौर व पवन ऊर्जा निर्मीतीची साधने निर्माण करण्यासाठी लागणारी उर्जा त्यातुन प्राप्त होणार्‍या ऊर्जेपेक्षा अधिक आहे.
  • अणुऊर्जा निर्मीतीकरुन निर्माण होणारा आण्विक कचरा भावी पिढीसाठी कचरा ठरेल.
  • झाडे ही सौर ऊर्जेचे रुपांतरण करणारी सर्वोत्त्म यंत्रणा आहे.
  • सूर्य व हरितद्रव्यावर आधारित अर्थव्यवस्था ही भविष्याची अर्थव्यवस्था आहे.
  • सौर ऊर्जेवरील thermal उपकरणे photo-voltaic उपकरणांपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत.
  • प्रारुपात वर्तमान विकास नमुन्याची वैशिष्टै वर्णन करताना द्वैतवाद हा शब्द प्रयोग न वापरता द्वंद्वाधारित शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरेल.
  • ऊर्जा व तंत्रज्ञान यांचा विकास व वापर याबद्दल मर्यादित च्या ऎवजी सुयोग्य वापर असा शब्द वापरणे योग्य राहिल.
  • भौतिकतेला भारतीय जीवनदृष्टीनुसार दुय्यम स्थान असा शब्द न वापरता सुयोग्य स्थान असा शब्दप्रयोग वापरणे योग्य राहिल.
  • धारणक्षम विकास नमुन्यामधे ग्रामविकासाचा विचार एका बाजुने करताना दुसर्‍या बाजुने बहुराष्ट्रीय कंपन्यांचा ही विचार करावा लागेल.
  • स्पर्धेचा संपूर्ण निषेध न करता सुयोग्य स्पर्धेचे नियम व मर्यादा निश्चीत कराव्यात.
  • मुक्ती या उच्चतम आध्यात्मिक जीवनध्येयासोबत पूर्णतेचा ध्यास इ.अन्य ध्येयांचा विचार सर्वसामांन्यापुढे ठेवावा लागेल.
  • धारणक्षम विकासाचे मॉडेल निर्माण करताना स्वातंत्राचा संकोच हॊणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल उद. क्युबा मध्ये हुकुमशाही आहे.
  • प्रत्यक्ष धारणक्षम विकास नमुन्याची काही उदाहरणे.अ.अमेरिकेलील एकात्म आरोग्य चळवळ, सेंद्रीय शेती चळवळ,स्वतःहुन जीवनस्तर घटवणे
  • आमिष जनसमूहाची माहिती घेण्यासाठी मधुकर वळंजू ह्यांचे पुस्तक उपयुक्त आहे.
  • क्युबा मध्ये अमेरिकी प्रतिबंध व रशिय़ाच्या पतनानंतर घटलेली आर्थिक मदत यामुळे सारा देश धारणक्षम आर्थिक विकासाचे नमुन्यानुसार चालवला जातो.
  • भारतातही अनेक कुटुंबे देखील असे जीवन जगणारी आहे.उदा सोनेजी कुटूंब २ एकर शेतीवर जगतात त्यासाठी इंजिनिअरींगची नोकरी सोडली आहे.
  • सरकारवर अवलंबून न राहता स्वतःमध्ये जीवनशैलीय़ बदलाचे प्रयत्न केले पाहिजेत.
  • आपल्या पायाखालचा अंधार घालवणे,Be and Make व्हा आणि घडवा यामध्ये Being ची प्रक्रिया महत्वपूर्ण आहे.

2 comments:

  1. Thank you, Bhushan ji. People in general, are required to be educated about this. As far as agriculture or agro products are concerned, the "sustainable growth" concept should be adopted and driven by rural sector. It should be "pushed" to the urban sector. Urban population is mostly not interested to understand and gauge the gravity of the issue of climate change or "un-sustainable growth". They say, we can afford to pay and hence we are paying and buying whatever we want, why should we be "lean". So, the farmers need to say, this is what we will produce and you urban people will have to manage with this much only. And, on the front of industries, governments need to put curbs on extracting the natural resources for running industries. But, then who is Government, nothing but the people. That is why I say, a lot of educating is required here.

    ReplyDelete
  2. Last 10 decades world has experienced two models.We can broadly term them as USSR and US models. Former belived in UTOPIA and the methodology followed was "Government Everywhere" as against the later one beliving in the LAW OF JUNGLE and the methodology followed was "Everyone For Himself". Based on learnings from both of them, we must develop another model for the current century.-Vinayak Kale

    ReplyDelete