१) "विकासा"ची एक विशिष्ट अशी संकल्पना सध्या जगभर प्रचलित आहे. भारतानेही ती स्वीकारलेली आहे. त्यामुळे, त्या "विकासा"मुळे सर्व जगाचे जे काही बरे किंवा वाईट व्हायचे , तेच भारताचेही होणार. "भारताचा विकास" म्हणून काही वेगळी संकल्पना (concept) वा प्रतिमान(model) असू शकते का, ह्याचा विचार शेवटी करु.
२) सध्याची विकासाची संकल्पना ही विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्या अनुषंगाने तयार झालेली आहे. जडवाद,द्वैतवाद. विखंडित विचार ,मूल्यनिरपेक्षता, इ. वर ती आधारित आहे.ही सारी विज्ञानातील "देकार्तीय प्रतिमाना"ची वैशिष्ट्ये आहेत. सामान्यत: १७ व्या शतकापासून हे प्रतिमान प्रचलित आहे.
३) विकासाची "जडवादी " संकल्पना: व्यक्तीच्या उपभोगाचे उच्चतमीकरण म्हणजे विकास.
per capita consumption/production/GDP मधील रेखीय वाढ (linear growth) हे विकासाचे उद्दिष्ट .प्रत्येकाने त्या दृष्टिने सतत प्रयत्नशील राहायचे. अन्य व्यक्ति,कुटुंबे, समाज, राष्ट्रे, निसर्ग ह्यांच्या भल्या-बुर्याचा विचार करण्याचे कारण नाही (द्वैतवाद) हिंसा, शोषण, चोरी ह्यांचा विचार करण्याचे कारण नाही (मूल्यनिरपेक्षता ) per capita हे सरासरीचे गणित त्याखाली विषमता झाकली जाते.
४) ह्यातून "अतिरेकी उत्पादना"चे औद्योगिक प्रतिमान उदयाला आले. संसाधने ,उर्जा, तंत्रज्ञान ह्यांचा अधिकाधिक वापर करुन सततची उत्पादनवाढ. वाहतूक , संपर्क साधने ,वित्तपुरवठा, बाजारपेठ अशा आनुषंगिक बाबींतही सतत वाढ ,विस्तार ह्यातून जी macro-economic growth होते, तोच विकास, सर्व राष्ट्रे विकासाच्या ह्या स्पर्धेत. कुवतीनुसार कोणी पुढे, कोणी मागे पण दिशा तीच.
५) वरवर पाहता हे चित्र गुलाबी . वैपुल्याचे स्वप्न, अमर्याद, अनंत वाढीचे ,उपभोगाचे आमिष. तीच माणसाची मूळ प्रवृत्ती. त्यामुळे प्रतिमानाची विनाप्रश्न स्वीकृती आणि अंमलबजावणी
६)परंतु, ह्या संकल्पनेतून २ मूलभूत मर्यादांचे उल्लंघन: अतिरेकी उपभोगातून माणसाच्या शरीर मनाच्या मर्यादेचे उल्लंघन: आणि अतिरेकी उत्पादनातून बाह्य निसर्गाच्या मर्यादेचे उल्लंघन.त्यातून विविध समस्यांचा उद्भव. ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांच्या नित्य वर्धिष्णू वापरातून जीवनाचे क्षेत्र , गती आणि जटिलता ह्यांत कमालीची वाढ.ती न पेलवल्याने माणुस आतून शरीर-मनाने मोडून पडत आहे.संसाधने आणि उर्जांचा अतिरेकी वापराने बाह्य निसर्गाची अपरिमित हानी. प्रचंड प्रदूषण ,जैविक विविधतेचा र्हास.अ-नवीकरणक्षम
संसाधनांच्या उपलब्धतेत सातत्याने घट. नवीकरणक्षम संसाधनांच्या पुनुरुज्जीवनाच्या वेगापेक्षा वापराचा वेग अधिक; त्यामुळे त्यांतही घट.
७)असंख्य शारीरिक, मानसिक, नैतिक, पारिवारिक,सामाजिक, पार्यावरणिक समस्यांचा उदय. एकूणातच सर्व जग समस्याग्रस्त,संघर्ष ग्रस्त, हिंसा ग्रस्त.
८) समस्या "इतरत्र आणि उद्यावर ढकलण्याचे धोरण
९) ह्यातून विकासाची प्रक्रिया "अशाश्वत" जमेपेक्षा खर्च खूप अधिक. दिवाळखोरी " Ecological Foot print" "१ पृथ्वी" पेक्षा खूपच अधिक
१०) हे धोरण आत्मविनाशक असल्याने त्यात परिवर्तन आवश्यक . "शाश्वतता" ही विकासाची प्राथमिक अट
११) त्यासाठी संकल्पनेतच परिवर्तन होणे आवश्यक ." उपभोगांचे उच्चतमीकरण" हे ध्येयच गैर,अनैतिक.मर्यादित पर्यावरणात अमर्याद भौतिक वाढ असंभव. त्यामुळे "उपभोगाचे इष्टतमीकरण" हि योग्य दिशा. ऊर्जा, तंत्रज्ञान ह्यांच्या वाढीवर मर्यादा आवश्यक.नवीकरणक्षम संसाधने आणि ऊर्जाच वापरण्याचे बंधन आवश्यक. समुचित तंत्रज्ञान ह्यातून शाश्वत विकास, धारणक्षम विकास.
१२)मात्र, अशा विकासातही अनेक अंगे दुर्लक्षित. व्यक्तिंचा भावनिक, बौध्दिक,आध्यात्मिक विकास; नैतिक विकास; परिवार-समाजाचा विकास ह्यांकडे लक्ष नाही.
१३)त्यामुळे, विकासाची संकल्पनाच मुळात व्यापक व्हायला हवी. ह्या सर्व आयामांना सामावून घेणार्या "सम्यक् " संकल्पनेची आवश्यकता.
१४)भारताचे योगदान नेमके ह्या ठिकाणी, भारतीय परंपरेत भौतिक विकासाला दुय्यम स्थान. जीवनाचे ध्येय "आध्यात्मिक" (मुक्ती). ते गाठण्यासाठी भौतिक सुस्थिती आवश्यक. उपभोग हे "साधन"---- "साध्य" नव्हे.चैतन्यवाद,अद्वैतवाद,एकात्म विचार. नीतिमूल्यांच्या मर्यादा, परस्पर-पुरकत्व इ. वर आधारलेली विकास संकल्पना. "शाश्वत भौतिक विकास"हे उपोत्पादन.
१५) आईन्स्टाईनोत्तर विज्ञानांची वाटचाल ह्याच दिशेत. देकार्तीय प्रतिमानाच्या पायालाच सुरुंग. मात्र, विकासाची विकृत संकल्पना अद्यापि तग धरुन.
१६)आपले तत्वज्ञान, परंपरा ह्यांच्या आधारे भारत"सम्यक विकासा"ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवू शकेल का? नेतृत्व आणि समाज दोघांवरही ते अवलंबून
१७) मात्र, अमेरिकेतले आमिष जनसमूह,क्यूबा येथे बर्याच प्रमाणात असा विकास प्रत्यक्षात आला आहे.त्यांना हे कसे साधले?
अधिक वाचनासाठी:-
१) सम्यक् विकास
२) वेगळ्या विकासाचे वाटाडे
३)निसर्गायन
श्री दिलीप कुलकर्णी यांचा संक्षिप्त परिचय --
1978 मध्ये अभियांत्रिकीची पदविका
1978 – 1984 पुण्याला टेल्को कंपनीमध्ये नोकरी
1984 – 1993 विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पुर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन.
1993 पासून – ‘पर्यावरण’ जगण्यासाठी कोकणातील एका खेडयात सहकुटुंब स्थायिक. विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट-लेखन.
दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके
वैदिक गणित (भाग 1 ते 4) (सहलेखन),निसर्गायण, अणुविवेक, वेगळया विकासाचे वाटाडे, दैनंदिन पर्यावरण,सम्यक् विकास
Ahead to Nature, ‘Saffron’ Thinking – ‘Green’ Living, चरित्र – जगदीशचंद्र बसू.
याखेरीज श्री.दिलीप कुलकर्णी ‘गतीमान संतुलन’हे ४पानी मासिक चालवितात.त्याची वार्षिक वर्गणी रु. 30 आहे.
No comments:
Post a Comment