(दीनदयाळ प्रेरणा केंद्र ,ठाणे येथे दि.१६ फ़ेब्रुवारी २०१० रोजी पं दीनदयाळ स्मृती दिनानिमित्त झालेल्या "सुयोग्य राष्ट्रीय आर्थिक धोरण" या विषयावरील डॉ. विनायकराव गोविलकर यांच्या व्याख्यानाचे शब्दशः टीपण खाली दिले आहे. टीपण तयार करताना लिखीत टीपण या दृष्टीने संपादित न करता मुळ व्याख्यानाचे स्वरुप तसेच ठेवले आहे.)
दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष मा. केळकरजी, आताच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री सतीशजी मराठे प्रास्ताविक केले ते श्रीमान बाक्रे, मी इथे यावे म्हणून ज्यांनी खूप वेळा मला फ़ोन केले ते श्री असेरकर, श्रीमान रविंद्रजी महाजन , मुकुंदरावजी गोरे, सगळीच जेष्ठ मंडळी आहेत त्यामुळे मी नावे कुणाकुणाची घ्यावी हा माझ्यापुढेही थोडासा प्रश्न पडला आहे. मला ईथे बोलावलेत त्याबद्दल सुरवातीला मी आभार मानतो आणि सुरवातीला प्राजंळपणे कबूल करतो कि मी भाषणे खुप केली खुप म्हणजे काही शेकडयांनी झाली असतील पण एखाद्या भाषणाचे दडपण येण्याची ही पहिली वेळ आहे. त्याची कारणे दोन आहेत.एक म्हणजे ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम करतो आहोत त्यांचे contribution खरे म्हणजे थोडेसे सुत्ररुपात मांडलेले आहे आणि त्याचा विस्तार करणे हे प्रत्येकाला आपाल्या प्रतिभेनेच करावे लागेल आणि तितकी प्रतिभा माझ्याकडे नाही याची जाणीव मला असल्यामुळे एक दडपण आहे. दुसरे दडपण म्हणजे सगळे जण इतके जेष्ठ आहात आणि या दीनदयाळजींच्या प्रेरणा केंद्रातून अनेक वर्ष काम करत आहात त्यामुळे माझ्यापेक्षा कितीतरी पट आणि किती तरी वर्ष अधिक आपण या सुत्ररुपाचा सखोल अभ्यास केलेला आहे.आणि त्यांच्यापुढे मी बोलायचे म्हणुन दुसरे दडपण आले आहे.पण ज्या परिवारातून मी लहानाचा मोठा झालो तिथे मला एक फ़ार छान वाक्य मी प्रथम वर्षाच्या वर्गात असताना चर्चेसाठी होते आणि ते होते संघाचे काम गुणारोपणाच्या प्रक्रियेने चालते.म्हणजे स्वयंसेवकावर सारखे गुणाचे आरोपण करायचे तु चांगला आहेस , तु चांगला बोलतोस, तु चांगला अभ्यास करतोस ,असे म्हणत राहायचे कधीतरी त्यालाही वाटायला लागते की हे सगळे खरे आहे आणि मग तोही असा समोर येऊन उभा राहतो.तसे काहीसे आता माझ्या बाबतीत आहे.पण मला मोठी सेफ़्टी आणि सिक्युरिटी अशी आहे की माझ्यानंतर २ अध्यक्ष बोलणार आहेत.दोघेही जेष्ठ आहेत त्यामुळे जे काही राहिले असेल चुकले असेल अशा प्रसंगाच्या कार्यक्रमात एक पद्धत असते की प्रमुख अतिथीने आधी बोलून घ्यायचे मग आपल्या माणसाने बोलायाचे त्यामुळे मी थोडेसे धाडस करुनच आपल्या समोर उभा अहे आणि आपण सगळे जेष्ठ आहात. उदार आह्त त्यामुळे मला प्रयत्न करायला काही हरकत नाही असे वाटते.आतापर्यंतच्या सगळ्या भाषणात थोडेसे घटनांवर आधारित विश्लेषणात्मक असे बोलणे जास्ती होते चिंतनात्मक बोलणे होत नाही आणि ते मी जाणिवपूर्वक टाळले पण आहे. पण आज हा थोडासा प्रयत्न करुन बघावा आणि आपल्याच मंडळींसमोर प्रयत्न करुन बघावा म्हणुन मी हे निमत्रंण स्विकारले खरे तर निमंत्रण याला म्हणत नाही मी एका अर्थाने ही आज्ञाच आहे. इतक्या जेष्ठ मंडळींनी ज्यावेळेला ५/६ वेळेला म्हटले तु ये तेव्हा नाही म्हणणे मला अवघड गेले,म्हणून मला जे काही वाटते ते सगळ्या दीनदयाळजींचेच असेल असे आपण कृपया समजू नये कारण त्याच्यात काही इण्टरप्रिटेशनचा भाग येतो तो दोष माझा समजून याच्याकडे बघावे असे मला वाटते. विषयाला नाव दिले आहे सुयोग्य राष्ट्रीय आर्थिक धोरण
राष्ट्रीय आर्थिक धोरण यातले धोरण हा शब्द मला असे वाटते एका शृंखलेतला आहे. शृंखला कदाचित तीन कडयांची असेल .जेव्हा आपण धोरण म्हणतो त्यावेळेला त्याला एक वरची कडी आहे आणि एक खालची कडी आहे. वरची कडी म्हणजे हे धोरण कशासाठी राबावायचे ते ध्येय. ही पहिली कडी म्हणजे उदाहरणच देऊन सांगायचे झाले आम्हाला शिक्षणाचे धोरण करायचे आहे मग हे धोरण करुन आम्हाला साधायचेय काय ? उदाहरणच जर घ्यायचे झाले तर साक्षरता आणायची आहे का लोकांना शिक्षीत करायचे आहे? हे जर उद्दीष्ट किंवा ध्येय ठरले नाही तर धोरण त्या उद्दीष्टांची पूर्ती करणारे होणार नाही. आम्हाला परराष्ट्र धोरण ठरवायचे आहे मग हे धोरण ठरवण्यासाठी आम्हाला आधी या धोरणापासून साध्य काय काय करायचे आहे हे जोपर्यंत identify होत नाही निश्चीत केले जात नाही तोपर्यंत धोरण यशस्वी झाले की अयशस्वी झाले ते ठरवता येणार नाही म्हणून आर्थिक धोरण ठरवण्यासाठी पहिली कडी म्हणजे आमचे उद्दिष्ट काय? दुसरी कडी ते उद्दीष्ट साधण्यासाठीचे धोरण कसे असावे ? आणि मग जी तिसरी कडी आहे ती म्हणजे धोरण राबवायचे कसे ? implementation of the policy आता आपण फ़क्त धोरणांचा विचार करत आहोत एखाद्या commercial organisation बाबतीत बोलायचे झाले तर असे या वर्षीचे ध्येय उद्दीष्ट उदा. ५० कोटीची विक्री करणे हे आहे.short term goal हे एकदा निश्चीत झाले की मग त्याच्यासाठी धोरणे ठरली जातील.धोरण काय असू शकते उदा. क्रेडीट पिरीअड वाढवून द्या.प्राईस कमी करा.अधिक स्टॉकिष्ट नेमा अधिक सेल्स कमिशन द्या हे धोरण असू शकते आणि हे राबवण्यासाठी जे plan, policy and procedure असे इंग्रजीत म्हणतात म्हणजे अंमलबजावणी असे ३ कडयांचा विचार केला तर मला वाटते त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो आता इथे चर्चेला आपण फ़क्त धोरण घेतले आहे आणि त्यामुळे त्याची जरी मी तिसर्या कडी पर्यंत नेली नाही तरी सुद्धा सुरवात मात्र मी ध्येयापासून किंवा short term goals /long term objectives किंवा goals पासून करु ईच्छितो. जे आम्हाला सुयोग्य आर्थिक धोरण हवे असे वाटते असावे वाटते त्याचे उद्दिष्ट काय असले पाहिजे हे जर आमच्या समोर असेल तर धोरण योग्य/अयोग्य असे ठरवता येऊ शकेल. आणि हे उद्दिष्ट आपल्याकडे सुदैवाने अनेक जणांनी सांगून ठेवले आहे.त्यातले काही नमुन्या दाखल २/३ गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करेन .
बाक्र्यांनी सुरुवातीलाच काही उल्लेख केले ,दाखले दिले मी पण योगी अरविंदांचा सुरवातीला दाखला देतो.आणि त्यंनी असे म्हटले होते उद्दिष्ट काय असावे ? वस्तु व सेवा यांच्या निर्मितीचे भले मोठे यंत्र निर्माण करणे हे आमचे भारताचे उद्दिष्ट नाही,नसावे असे त्यांना म्हणायचे असेल.आता जे आपल्याला दिसते देशाची प्रगती माणसाचा विकास म्हणजे काय ? तर प्रचंड मोठयाप्रमाणात आणि विविध वस्तुंचे आणि सेवांचे उत्पादन करायचे आणि consumption करणे हे झाले म्हणजे प्रगती झाली असे म्हटले जाते मानले जाते मोजले जाते.standard of living मोजण्याचे जे काय मापदंड आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हेच आहेत की तुम्ही किती electricity consume करता,किती टेलीफ़ोन कनेक्शन असतात वगैरे? त्यामुळे भले मोठे यंत्र वस्तु आणि सेवांची निर्मिती करावी हे उद्दिष्ट नाही असे योगी अरविंदांनी म्हंटले मग उद्दिष्ट काय असेल त्यांनी जे म्हंटले त्याच्यातून मला चार गोष्टी दिसल्या .पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे समाजातील प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे सुख मिळावे मला वाटते अगदी मोजून मापून शब्द वापरलेले दिसतात. नुसते असे नाही म्हटले की समाजातील प्रत्येक जण सुखी व्हावा म्हणतानाच त्यांनी असे म्हंटले आहे की ज्याच्यात्याच्या मगदूराप्रमाणे त्याला सुख मिळावे By nature everybody is different प्रत्येक जण वेगळा आहे. वेगवेगळ्या गुणवत्तांचा आहे वेगवेगळ्या अपेक्षा असलेला आहे. त्यामुळे योगी अरविंदांनी मला असे वाटते अतिशय योग्य शब्दात जे सांगितले की ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे त्याला सुख मिळावे. आता हे एकदा डोळ्यासमोर आणले तर आताच्या ज्या काही अस्तित्त्वात असलेल्या दोन प्रमुख विचारसरणी आपल्याला capitalism आणि communism च्या बाबतीत दिसतात. मला वाटते पटकन त्याचा आपण इथे रेफ़रन्स घेऊ शकतो .कम्युनिझम म्हणजे classless society and same satisfaction to everybody it is taken for granted.योगी अरविंदांनी underline केले आहे ज्याच्या त्याच्या मगदूरप्रमाणे त्याला सुख मिळावे ज्याची त्याची अपेक्षा सुखाची भिन्न भिन्न आहे. एकच गोष्ट,एकच वस्तु,एकच सेवा सगळ्यांना मिळाली म्हणजे मिळणारे सुख सारखे असेल असे नाही.
त्यांच्या एकूण विवेचनात मला जे दुसरे उद्दीष्ट सापडले ते म्हणजे त्याच्या कामाचा आनंद त्याला मिळावा.सुख वेगळे आहे कामाचा आनंद वेगळा आहे म्हणून कदाचित त्यांनी हे दोन वेगळे मांडले असावे आणि आता कामाचा आनंद जर मिळयला हवा असेल तर स्वाभाविकपणे आपण आताच्या एकूण अर्थव्यवस्थेत जर बघितले तर लक्षात येतात २ गोष्टी एक आहे standardisation आणि दुसरे आहे mechanisation प्रमाणिकरण सर्व सारखे आणि त्याचा आग्रह प्रचंड मोठ्याप्रमाणावर जगभर चाललेला आहे की सगळे standardised असले पाहिजे आणि जर ते standardised करायला लागले तर मग कामाचा आनंद हा त्याला मिळु शकतो का? सगळे mechanised जर झाले ,सगळे यंत्रांनीच जर उत्पादन सुरु झाले तर मग त्या कामगाराचे काम केल्याचा आनंद मिळण्याची व्यवस्था निर्माण होते का ? या उद्दिष्टानुसार आता जे घडतेय ते मी थोडे तुलना करायचा अशासाठी प्रयत्न करतोय की सध्याच्या अर्थव्यवस्थेतल्या स्वाभाविकपणे जे बदल अपेक्षित आहेत नविन धोरणामध्ये एखाद्या कारागिराने चप्पल बनवणे आणि एखाद्या चपलेच्या कारखान्यात चप्पल बनणे आनंदाच्या दॄष्टिने याच्यात निश्चितपणे फ़रक राहतो.
तिसरे जे उद्दिष्ट जे मला दिसले त्यांच्या मांडणीमध्ये ते म्हणजे मिळवले ते उपभोगण्यासाठी पुरेसा फ़ुरसतीचा वेळ मिळावा हे सुद्धा आर्थिक चिंतनाच्या उद्दिष्टाचा भाग आहे.थोडक्यात नुसते मिळवावे हे पुरेसे नाही ;मिळालेले उपभोगता येण्यासाठी फ़ुरसतीचा वेळ सुद्धा मिळाला पाहिजे.याच्यात दोन गोष्टी मला अद्यारुत दिसतात एक गोष्ट म्हणजे फ़ुरसतीचा वेळ असला पाहिजे हा एक भाग आणि दुसरा भाग जे मिळवले आहे ते उपभोगायचे असते हे सुद्धा कळले पाहिजे.नुसतेच मिळवायचे असते इथपर्यंत थांबून चालणार नाही आणि ह्याचसाठी उपभोगण्याचा आनंद मिळण्यासाठी फ़ुरसतही असायला पाहिजे मला वाटते दोन गोष्टी त्याच्यात येतात म्हणजे कौटुंबिक शांतता आणि सामाजिक शांतता . अर्थव्यवस्था अशी असली पाहिजे की ज्यानी आम्हाला ही शांतता उपलब्ध करुन दिली पाहिजे की ज्यामुळे मी कमवले ते कमवलेले सुद्धा मला शांतपणे उपभोगता आले पाहिजे.समाज अस्वस्थ असेल ,संपूर्ण समाजात स्पर्धाच असेल,आर्थिक विषयाचा reference द्यायचा झाला तर संपूर्ण समाजात सर्व स्तरावर सतत स्पर्धाच असेल तर स्पर्धा ही कायमच जीवघेण्या स्पर्धेचे स्वरुप घेते आणि मग अश्या स्पर्धेमध्ये मला टिकायचेच नसते तर मला स्पर्धेत सर्वांच्या पुढे राहावे लागते.मग मला शांतपणे मिळवल्याचा उपभोग घेण्याच्या साठी ही सवड मिळु शकते का हा प्रश्न आताच्या व्यवस्थेमध्ये निश्चित येतो.
चवथे उद्दिष्ट जे योगी अरविंदांनी मांडले ते साधे, सोपे,समृद्ध व सुंदर जीवन जगता यावे. सगळेच सोपे सोपे शब्द आहेत साधे सोपे सुंदर आणि समृद्ध ह्याचा जर थोडा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर मला असे वाटते की याच्यामध्ये आपण जे वारंवार दीनदयाळजींच्या एकूण विवेचनात वाचत आलो आहोत ते म्हणजे केवळ शारिरीक गरजांची पूर्ती होऊन भागणार नाही.मला साधे सोपे ,समृद्ध ,सुंदर जीवन जगायचे असेल तर मल शरीराबरोबरच मन आणि बुद्धी इतपर्यंतच थांबतो कारण त्यापलिकडचे माझ्या सारख्याला सांगता येण्यासारखी शक्यता नाही. पण हे सुद्धा ह्याही गरजांची शक्यता पूर्तता करण्याची त्याची आधी ईच्छा असली पाहिजे मात्र शक्यता असली पाहिजे म्हणजे ही आधी गरज वाटली पाहीजे की मला समृद्ध जीवन जगायचे आहे तर केवळ शारिरीक गरजा भागल्याने माझे जीवन समृद्ध नाही होणार त्यासाठी मला त्याच्यातही मला ह्याच्यापलिकडचे ही काहितरी मिळाले पाहिजे. हे जर आपण उद्दिष्ट म्हणून डोळ्यासमोर ठेवले ज्यासाठी धोरण करायचे आहे तर मग आता असणार्या धोरणांमध्ये काय काय फ़रक आहे ते मी आपल्याशी थोडे जाता शेअर केले.
उद्दिष्टांच्या बाबतीत दुसरा एक दाखला द्यावा असे मला वाटते तो म्हणजे शुक्राचार्यांचा. शुक्रनीति मध्ये प्रकरण सहा श्लोक ५५ याच्यामध्ये फ़ार छान उद्दिष्टांची चर्चा केली आहे. एका श्लोकात प्रजेच्या निर्वाहाचा साक्षेपाने विचार करुन कृती करण्यार्या राजांच्या वर्तनाचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. दोन गोष्टी इथे मला थोडया फ़ोकस कराव्याश्या वाटतात.एक आहे प्रजेच्या निर्वाहाचा म्हणजे मूळ हेतू काय मुळ उद्देश काय तर प्रजेचा निर्वाह नीट झाला पाहिजे आणि तो कोणी करायचा तो नीट व्हावा म्हणून राजांच्या वर्तनाचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे ही जबाबदारी कोणाची प्राथमिक दायित्व कोणाचे राजाने हे करावे आणि राजाने हे करण्यासाठी त्याचे वर्तन कसे असावे हे सांगणारे हे शास्त्र आहे. त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र एकमेकांपासून फ़टकून राहू शकत नाहीत. ती हातात हात घालूनच चालावी लागतील किंवा जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे आणि पहिली कडी आनि शेवटची कडी त्याची अंमलबजावणी करायची आहे. हे धोरण त्याचवेळेला सफ़ल होईल तेव्हा ही दोन शास्त्रे व समाजशास्त्र बरोबर चालेल.
कौटील्याने याबद्दल अधिकरण १५ मध्ये काही सांगून ठेवले आहे मनुष्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे अर्थ म्हणजे पुन्हा दोघांनी पण उपजीविका निर्वाह हा पहिला बिंदू पकडलेला सापडतो .भूमिवर माणसे जींवत राहतात म्हणुन भूमी अथवा पृथ्वी अर्थ आहे. पृथ्वीची प्राप्ती व पालन कसे करावे हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. पृथ्वीची प्राप्ती कशी करावी आणि पालन कसे करावे आता पृथ्वीची प्राप्ती कोण करणार व पृथ्वीचे पालन कोण करणार म्हणजे पुन्हा शुक्राचार्यांनी जे म्हटलेय की राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे बरोबरच चालावे लागेल. थोडया विस्ताराने कौटील्याने असे म्हटले ह्याचे दोन पैलू आहेत. एक पैलू आहे वार्ताशास्त्र ,दुसरा पैलू आहे दंडनीति.वार्ताशास्त्रासाठी त्यांनी रचलेल्या श्लोकाचा एक भाग असा आहे "कृषिपशुपाल्येवाणिज्यंच वार्ता .." वार्ता म्हणजे काय कृषी ,पशुपालन आणि वाणिज्य क्रम असाच त्यांना अपेक्षित होता की नाही हे आपण ठरवायची बाब आहे.पण भर कशावर असला पाहिजे अर्थशास्त्राचा तो मात्र त्यांनी मांडला आहे कृषी ,पशुपालन आणि वाणिज्य याला त्यांनी वार्ताशास्त्र म्हंटले म्हणजे उपजीविका म्हंटले. दंडनीति हा दुसरा पैलू आणि त्याच्यात त्यांनी चार अतिशय मोजके शब्द वापरले " अलब्धलाभार्थी ,लब्धपरिरक्षणि, रक्षितविवर्धनि,वृद्धस्यतीर्थेषु प्रतिपादिनि " काय व्हायला पाहिजे अलब्ध लाभार्थी जे मिळवलेले नाही ते कसे मिळवावे म्हणजे अर्थ कसा संपादन करावा. लब्धपरिरक्षणि संपादित अर्थाचे रक्षण कसे करावे ,रक्षितविवर्धिनि जे सांभाळले आहे ते वाढवावे कसे आणि शेवटचे इतपत तर आपण रोजच बघतो जे मिळालेले नाही ते मिळवायला पाहिजे जे मिळाले आहे ते साठवायला पाहिजे जे रक्षण केलेले आहे ते वाढवायला पाहिजे आताचे भाषेत सांगायचे तर to earn, to store, and capital apriciation या तीन गोष्टी आल्या इंग्रजीत सांगायचे झाले हे संस्कृतातले तर मला वाटते हे आहे. ते आपण करतोच पण जो चौथा भाग त्यांनी सांगितलाच वृद्धस्य तीर्थेषु प्रतिपादिनि ज्याची वृद्धी केली जे मिळवले जे रक्षण केले आणि जे वर्धमान केले वाढवले ते वाढवलेले अशा अभिवर्धीत द्रवाचा अर्थाचा संपत्तीचा विनियोग कसा करावा हे सांगणे हे सुद्धा अर्थशास्त्राचे उद्दिष्ट आहे. असे आपल्याला कौटील्याने सांगितलेले दिसते. हे जर सगळे बघितले तर मला असे वाटते धर्म तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र , समाजशास्त्र हे काही अलग अलग असे नाही. एकमेकांशी जोडलेले आहे त्यामुळे सुयोग्य राष्ट्रीय आर्थिक धोरण हे केवळ आर्थिक बाबतीत असू शकते ही शक्यता माझ्यासारख्याला कमी वाटते. कोणीतरी प्रत्येक aspect वर focus केला पाहिजे म्हनून अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक बाबांवर focus करावा हाच त्याचा अर्थ मी घेतो.पण केवळ आर्थिक बाबीचे धोरण आखावे त्याची उद्दिष्टे वेगळी असावीत त्याचे implementation वेगळे असावे असे होऊ शकत नाही मला वाटते पं दीनदयाळजींच्या पण कथनात ज्याला आपण एकात्म एकात्म हा शब्द वापरतो holistic अस ईंग्रजीमध्ये शब्द वापरतो कदाचित त्याच्यामध्ये हा सुद्धा अर्थ गर्भित असावा.आणि त्यामुळेच माणुस त्याला आपण चार म्हणतो व्यष्टी,समष्टी, त्यानंतर सृष्टी आणि परमेष्टि यांचा परस्पर संबंध लक्षात ठेवल्याशिवाय आपली उद्दिष्टे धोरण आणि implementation हे काही नीट करता येईल असे वाटत नाही. त्यामुळे धोरणांकडे जाण्यापूर्वी उद्दिष्ट काय असायला हवीत आणि ती उद्दिष्टे कशी एकमेकांशी संबधीत आहेत याचे थोडक्यात मी आपल्यासमोर विवेचन करण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला.
हे आपल्याकडचे आर्थिक चिंतन झाले असेच चिंतन आता आहे का? आधुनिक आहे का? मी पाश्चात्य हा शब्द वापरत नाही .आधुनिक आहे का ? कारण पाश्चात्य म्हटले म्हणजे त्या देशातच आहे आणि भारत ,चीन अशा पौर्वात्य देशात नाही असा गैरसमज होऊ शकतो म्हणून मी त्याला आधुनिक अर्थचिंतन असे म्हणतो त्याच्याबद्दलची मांडणी आपल्याकडे अनेकवेळा अनेकांनी मला अशी खात्री आहे आपण इथे बसलेल्यांनी अनेक ठिकाणी केली असेल. ती सगळी सुखे म्हणजे गरजपूर्ती गरज म्हणजे शारिरीक गरज या आधारावर मांडणी केली जाते किंवा आताची रचना सगळी तशी आहे आणि या गरजांची पूर्तीकरण्यासाठी प्रामुख्याने वस्तु सेवा साधने उपकरणे ही निर्माण करणे हि अधिकाधिक निर्माण करणे आणि ती सतत आणि भरपूर सुखासाठी या साधनांचा संग्रह किंवा संचय करत राहणे म्हणजे सुख मिळवणे आणि ते सततचे सुख टिकवणे असे मानले जाते मगाच्याही चर्चेत आणि आताही बाक्रेंच्या बोलण्यामध्ये एका विषयाचा उल्लेख आला हे सगळे करण्यासाठी एक माध्यम आवश्यक आहे. विनिमयाशिवाय सगळ्यांच्या गरजांची पूर्ती होऊच शकणार नाही म्हणून विनिमय सुरुवातीला वस्तुविनिमय आला पण वस्तुविनिमयाच्या अडचणीमुळे पैसा नावाचे साधन किंवा माध्यम माणसाने शोधुन काढले त्याचे काही फ़र विस्ताराने विवेचन करण्याची आवश्यकता नाही .माझ्याकडे एक गाय आहे आणि मला दोनच किलो गहू पाहिजे, गाय सरप्लस असेल माझ्याकडे पण दोन किलो गव्हासाठी मी गाय कशी exchange करणार म्हणुन मग सोयीसाठी पैसा नावाचे माध्यम आले आणि आता त्यांनी त्याचा उल्लेख केला पैसा हाच विषय महत्वाचा झाला माणसाने सुखासाठी वस्तु किंवा सेवा किंवा उपकरणे साधने पाहिजे ते मान्य केले त्यांचा संग्रह केला संग्रह केला तर माझ्या गरजा आज आणि उद्याही पूर्ण होतील हेही मान्य केले. पण त्याचा संचय करने सोपे जावे म्हणून वस्तुंचा संचय बाजूला राहिला आणि पैशाचा संचय सुरु झाला. जीवनमान उंचवण्यासाठी म्हणून हा पैशाच्याही संचय अधिकाधिक व्हावा अशी थोडीशी अहमहिका सुरु झाली मागेच आता मी ज्या तीन गोष्टी सांगितल्या कौटिल्याच्या भाषेतल्या अलब्ध लाभार्थी लब्धपरिरक्षणि आणि रक्षितविवर्धिनि या करण्यासाठी साहजिकच सत्तेची आवश्यकता निर्माण झाली आणि हे सगळे करण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टी पुढे आलेल्या आधुनिक अर्थचिंतनात दिसतात एक म्हणजे स्पर्धा दुसरे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्य आणि तिसरे म्हणजे खाजगी मालमत्ता आणि वारसा हक्क आपण ह्याला देन म्हणु शकतो आधुनिक अर्थचिंतनाची देन काय तर या तीन गोष्टी प्रामुख्याने मला वाटतात .या तीनहीचे फ़ार मोठे justification दिलेले आपल्याला दिसते.स्पर्धा असलीच पाहिजे बाजारात स्पर्धा नसेल तर हे काहीच होणार नाही.व्यक्तिस्वातंत्र्य असले पाहिजे कारण माणूस हा आर्थिक माणूस आहे आणि नफ़्याची प्रेरणाच त्याला कामाला भाग पाडते आहे आणि खाजगी मालमत्ता जर ठेवली नाही तर मनुष्य हा धनाचा संचय करेलच असे सांगता येत नाही याचे परिणाम काय झालेले दिसतात विस्ताराने हे सांगण्याची मला वाटते आपल्या सारख्यांच्या समोर आवश्यकता नाही.
परिणाम पहिला झालेला दिसतो तो म्हणजे पैसा साधन न राहता साध्य झाले पैसा मध्यस्थ म्हणून आला होता एक facilitator म्हणून आला होता पण तेच साध्य झाले खर तर सुख मिळवणे हे उद्दिष्ट. ते सुख मिळवण्यासाठी गरजांची पूर्ती आणि गरजांची पूर्ती करण्यासाठी वस्तु सेवा साधने उपकरणे असणे ही आवश्यकता संचय वस्तु सेवा साधनांचा करायच्या ऎवजी संचय पैशाचा सुरु झाला त्यामुळे सुख मिळवण्यासाठी गरजा भागवणे हे ध्येय न राहता ध्येयच बदलले का ? ध्येय झाले पैसा कमवणे आणि टिकणे म्हणजे ज्याच्यासाठी पैसा होता ते ध्येय थोडेसे बाजूला होऊन पैसा मिळवणे आणि पैसा कमवणे हे ध्येय झाले. दुसरा एक परिणाम झालेला दिसतो तो म्हणजे पैशात न मोजता येणारे घटक हे एकूण अर्थचिंतनाच्या बाहेरच राहिले.असे अनेक घटक आहेत कि जे पैशात मोजताच येत नाहीत.पण जे एकूण या उद्दिष्टांसाठी धोरणांसाठी आणि implementation साठी अत्यंत आवश्यक आहेत असे सगळे घटक हे एकूण चिंतनाच्या बाहेर राहिले. उत्पादन खर म्हणजे हे गरजांच्या पूर्तींसाठी उत्पादन आहे आणि गरजांची पूर्ती सुखासाठी आहे मग हे उत्पादन जर गरजांच्या पूर्तींसाठी असेल तर ते गरजेनुसार मागणीनुसार केले पाहिजे आज आपल्याला जो परिणाम दिसतो तो असा आहे की हे उत्पादन गरजेंच्या पूर्तींसाठी किंवा मागणीच्या पूर्तीसाठी होतच नाही अनेक वस्तुंच्या बाबतीत आपल्याला असे दिसते की मागणीपूर्वी आणि मागणी नसताना सुद्धा उत्पादन होते.अशा वस्तुंचे उत्पादन होते की ज्याची कोणीही मागणी करत नाही तरी उत्पादन होते अशा पद्धतीने उत्पादन होत आहे की जे मागणी येण्याच्या आधीच उत्पादन करुन ठेवले जाते मागणी इतके उत्पादन वा मागणीला अनुसरुन उत्पादन असे न होता mass production साठी हवे तेवढे उत्पादन असे उत्पादन होताना आपल्याला दिसते याचा स्वाभाविकच काय परिणाम आहे तो आपल्या सगळ्यांना सहज जाणावतो तो म्हणजे एक परिणाम म्हणजे प्रचंड westage wastege fo raw material ,wastege of natural resources दुसरा एक परिणाम म्हणजे नको त्या गोष्टीचे उत्पादन आणि नको त्या गोष्टींची त्यानंतर निर्माण केली गेलेली मागणी
खरे म्हणजे आर्थिक चक्र चालते ते मागणी -पुरवठा - उत्पादन- factors of production ची employment त्यापासून income त्यापासून पुन्हा क्रयशक्ती आणि मागणी असे सायकल आहे चक्र आहे. need supported by purchasing power it becomes demand when demand is placed in a market somebody has to make the supply पहिली step झाली गरज दुसरी step झाली demand तिसरी step झाली supply supply करण्यासाठी somebody has to produce हे production करायचे असेल तर factors of production land labour capital and employment ,enterprise should be employed once they are employed ही पुढची step झाली employment of factors of production आणि त्यांना एकदा employ केले की त्या प्रत्येकाला मिळणारे उत्पन्न ही त्या आर्थिक चक्रातील पुढची step झाली land ला मिळणार rent, labour ला मिळणार wages, interest मिळणार capital साठी आणि profit मिळणार enterprise साठी म्हणजे ही झाली पुढची step ज्याच्यात income मिळते आणि income मिळाले की पुन्हा purchasing power येते.purchasing power आली की demand हे सगळे चक्रच भेदून भेदून म्हणजे कसे मागणी नसताना पूरवठा , साधी साधी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.cold drinks च्या बाटल्या अगदी पाचशे उंबरा नसलेल्या गावात सुद्धा त्याचा पुरवठा होऊन पडलेला आहे. प्रचंड मोठी जाहिरात केली जाते पुरवठा करायचा म्हणजे त्या आधीच उत्पादन करुन ठेवले आहे आणि प्रचंड मोठया प्रमाणावर करुन ठेवला आहे. waste मगाशी मी जो शब्द वापरला तो आपल्या लक्षात येऊ शकतो नैसर्गिक साधनसंपत्तीचा त्यामुळे अतिशय मोठया प्रमाणावर नको त्या गोष्टींसाठी वापर याला मी waste म्हणतो. म्हणजे ते पाणी वाया जाते का? आज निर्माण केलेले ते दोन महिन्यांनी खराब होते का ? हा भाग बाजूला ठेवून देऊ. पण ह्या बाटल्या भरण्यासाठी केरळमधल्या एखाद्या तालुक्यामधल्या अख्या विहिरींचे पाणी आटणे ही आपल्याकडे घडलेली घटना ऎकली आहे आणि मग कोर्टाला त्याच्यात हस्तक्षेप करुन त्या विहिरीचे पाणी तुम्ही याच्यासाठी इतक्या मोठया प्रमाणावर वापरायला बंदी घालणे किती मोठे wastege of natural resources होत याचे एक उदाहरण आहे आणि दुसरे हे जे waste होते आहे तसेच दुसरे काय होतेय तर गरज नसलेल्या गोष्टींसाठी मागणीची निर्मीती होते आहे. आणि ही निर्मीती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते म्हणजे कदाचित तुम्हाला मला त्याच्यामध्ये एक prestige वाटायला लागते.माझ्याकडे माझा साहेब आला आणि मी त्यांना गुळ पाणी दिले हे काय बरोबर नाही वाटत.त्याच्यापेक्षा एखाद्या चांगल्या ट्रे मध्ये दहा बारा प्रकारच्या कोल्ड्रींक्सच्या बाटल्या नेऊन जर मी ठेवले तर मी काहीतरी आधुनिक आणि चांगला असे साहेबाला वाटेल असे मला वाटते मनस्थिती बदलणे मग कदाचित छोट्या मुलाला घेऊन कधीतरी catbury काय असते ते बघावे म्हणून त्याच्या नावाने मी त्याचा उपभोग घेणे अशी एकदा नोंदवलेली मागणी हळुहळु गरज होणे चंगळवाद चंगळवाद म्हणजे काय हो दुसरे ? त्याची गरज नाही त्याची मागणी नोंदवणे म्हणजे चंगळवाद असे मला वाटते ज्याची गरज आहे त्याची मागणी नोंदवली तर ती चंगळवादात नाही जाणार गरज नसताना मागणी नोंदवणे गरज नसलेल्या वस्तुंची मागणी नोंदवणे म्हणजे मात्रा आणि प्रकार demand in more quantity and demand for those goods which are not necessities म्हणजे चंगळवाद दुसरे काय? हे सगळे परिणाम आपल्याला या उत्पादनाचे चक्र जे मी आता economic cycle सांगितले त्याच्यात उत्पादनाची जी step आहे गरज मागणी पुरवठा व उत्पादन ही step आहे याच्या ऎवजी गरजेच्या जागीच उत्पादन आल्यामुळे आणि उत्पादनाच्या जागेवर गरज गेल्यामुळे हि सगळी गडबड आपल्याला झालेली दिसते.
ज्याचा उल्लेख आता मगा ध्येयाच्या बाबतीत झाला होता उद्दीष्टाच्या बाबतीत झाला होता रोजगारासाठी काम करणे मजूरी करणे निर्मीतीच्या आनंदासाठी मजूरी न करणे किंवा करता न येणे हा एक त्याचा झालेला परिणाम त्यामुळे माणसाचे काम हे monotonous झाले माणुस जीव न लावता त्या यंत्रावर यंत्रासारखा काम करु लागला.स्पर्धा हा अविभाज्य घटक झाल्याबरोबर जसे production system बदलल्याने waste झाली तशी स्पर्धा आल्यामुळे सुद्धा वेस्ट आली. मला जर बाजारात राहायचे आहे तर कोणाबरोबरतरी स्पर्धा करायचीच आहे आणि स्पर्धा करायची आहे म्हणजे माझ्याकडे पुरेश्या मात्रेमध्ये ,संख्येमध्ये quantity मध्ये वस्तु असल्याच पाहिजेत.त्या कमीत कमी कॉस्ट मधे बनल्या पाहिजेत वगैरे जी बंधने येतात त्यामुळे वेस्ट पहिला टप्पा दुसरा टप्पा म्हणजे दुसर्याला वाईट करणे म्हणजे मी चांगला होईन ही एक प्रवृत्ती दुसर्याला संपवणे ही त्याच्या पुढची स्टेप आणि हे सहजच घडणार आहे.
मी कायम एक उदाहरण देतो कादाचित ते ह्या एवढ्या प्रबुद्ध नागरिकांसाठी फ़ार बाळबोध होईल. एका शिक्षकाने वर्गामध्ये मुलांना बसवले आणि फ़ुगे दिले गॅसचे फ़ुगे फ़ुगे वर गेले हातात दोरी बांधलेली राहिल.आणि मग त्या शिक्षकांनी सांगितले विद्यार्थ्यांना की एक अर्धा तासाने मी पुन्हा वर्गात येईन आणि त्याच्या हातातला फ़ुगा असेल शिल्लक त्याला १० हजार रुपये बक्षिस देतो. शिक्षक बाहेर निघुन गेला काय झाले असेल वर्गात शिक्षक अर्ध्यातासानंतर परत आल्यावर आपण सहज कल्पना करु शकता त्यातल्या त्यात जो धट्टाकट्टा विद्यार्थी होता उँच होता त्याने आपल्या डाव्या हातात उँच फ़ुगा धरला आधीच उँच आणि फ़ुगा आणिक उँच धरला आणि उजवा हात मोकळाच होता त्याने दुसर्याचे फ़ुगे फ़ोडायला सुरवात केली दहा बारा जणांचे फ़ुगे तो सहज फ़ोडू शकला एखाद दुसर्याचा जोपर्यंत फ़ुगा फ़ुटला त्यावेळेपर्यंत तो बिचारा गपचूप बसला मी काय करणार मी अशक्तच आहे पण असे ज्यावेळेला दहा बारा फ़ुगे फ़ुटले दहा बारा जण एकत्र आले आणि त्यांचे दोन्ही हात रिकामे होते त्याचा एक हात रिकामा होता आणि मग या सगळ्यांनी मिळुन उरलेल्या सगळ्यांचे फ़ुगे फ़ोडून टाकले मग तो शिक्षक आत आल्यानंतर सगळ्यात सुखी आनंदी प्राणी तो शिक्षक होता कारण त्याचे दहा हजार रुपये वाचले होते.स्पर्धा काय करते सगळ्यांचे फ़ुगे फ़ुटले ही तर वेस्ट झालीच शिवाय आपापसात कारण नसताना आणि तिसरी गोष्ट ultimate मक्तेदारी ही माझ्याकडेच राहावी ही प्रत्येकाची ईच्छा आणि त्यासाठी सगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करुन मक्तेदारी निर्माण करणे ही एक स्थिती येते कदाचित ती मक्तेदारी एका माणसापुरती मर्यादित राहते कदाचित ती मक्तेदारी एखाद्या ग्रुपपुरती मर्यादित राहते आताच्या भाषेत सांगायचे झाले तर त्याला कार्टेल्स असे सुद्धा म्हणता येऊ शकतो. हा परिणाम आता आपल्याला दिसतो
व्यक्तिस्वातंत्र्य प्रचंड राहिले पाहिजे ज्याला त्याला मुभा असली पाहीजे.आपल्या क्षमता वापरण्याची परवानगी असली पाहिजे कमीतकमी हस्तक्षेप शासनाचा झाला पाहिजे असे पण आताच्या आधुनिक अर्थचिंतनात म्हटले जाते त्याचा परिणाम हा आपण सगळे जण बघत आहोत.समाजहिताला प्रचंड बाधा येते आणि याचे उद्दिष्ट आपण जे म्हणतो की सुखाने त्याला मिळवलेल्या आणि संग्रहित केलेल्या आपल्या संपत्तीचा उपभोग घेता आला पाहिजे .ते होऊ शकत नाही फ़र मोठ्या प्रमाणावर काय काय घडताय हे आपण हैती सारखा देश मेक्सिको सारखा देश इथे बघु शकतो धनवान माणसांना घराच्या बाहेर पडणे आणि आपल्या कार मधून जाणे हे जेव्हा पायी जाणे अशक्य झाले तेव्हा गाड्या आणल्या. गाड्यांवर दगडफ़ेक सुरु झाली तेव्हा बुलेट्फ़्रुफ़ गाडया आणल्या. बुलेटफ़्रुफ़ गाडया आल्यावर लोक रस्त्यावर बसून जाणे बंद केले आणि मग ह्यांनी हेलिकॉप्टर मधून residence to factory असा प्रवास सुरु केला. संपत्ती आहे की नाही पण त्याचा उपभोग शांततेने घेता येण्याची शक्यता नाही. हे ही आपल्याला आताच्या अर्थचिंतनाचे परिणाम दिसतात.
मला असे वाटते आणि आता जी घटना घडून गेली सप्टें २००८ ला जी जागतिक स्तरावर आली आणि सगळ्या देशभर पसरली अमेरिकेत तिची सुरुवात झाली वित्तीय संकट आले आणि आर्थिक मंदीत रुपांतरित झाले. त्यातून पण मिळालेले काही आपल्याला धडे हे मला वाटते आत्ताच्या implimented धोरणाचा एक परिणाम म्हणून बघता येईल. तिथल्याच प्रसिद्धी माध्यमांनी एक छान वाक्य ह्या आर्थिक घडामोडींवर केलेय lesson म्हणून इंग्रजीतले वाक्य असे आहे.butcher,backer,breaver create wealth खाटीक , बेकरीवाला, आणि दारूवाला हे संपत्ती निर्माण करतात .butcher,backer,breaver create wealth not the layhman brothers.अगदी मला वाटते आठ शब्दात त्यांनी आताचे वर्णन केले आहे सगळ्यांना घाई झाली आहे पुन्हा जर कौटील्याच्या भाषेत सांगायचे तर अलब्ध लाभार्थी घाई झाली आहे सगळे मिळाले पाहिजे मलाच मिळाले पाहिजे आणि लवकर मिळाले पाहिजे आणि दुसर्याला मिळायला नको त्याचा हा परिपाक आहे. दुसरा अर्थ त्याचा असा निघतो की श्रीमंत होणे म्हणजे वेल्थ create करणे नाही. देशाच्या विकासाचे अर्थशास्त्र करायचे असेल तर wealth निर्माण करायला लागेल. लोक नुसती श्रीमंत होऊन चालणार नाही. आणि मी नेहमी वारंवार एक उदाहरण देत आलो ते उदा म्हणजे समजा मी एखाद्या कंपनीत शेअर घेतले दोन लाख रुपयाचे एक पंधरा दिवसात तो शेअर बाजाराचा सेन्सेक वर गेला आणि दोन लाखाच्या शेअरची आजची बाजारची किंमत तीन लाख रु झाली मी ते शेअर विकले आणि तीन लाख रु. घेतले मला income झाले की नाही माझे bank balance वाढला की नाही दोन्हीची उत्तरे होकारार्थी आहेत.पण देशासाठी काही wealth create झाली का ? आणि जर wealth create झाली नसेल तर देशाची प्रगती करायला ह्यांनी हातभार लावला का? इतका सोपा साधा प्रश्न आहे मी एखादा चांगला प्लॉट घेतो एखादा बंगला घेतो एखादे घर घेतो एखादे शॉप घेतो imovable property purchase करतो समजा एक दहा लाखाला ती घेतली काही कालांतरानंतर त्या दहा लाखाची पंधरा लाख किंमत झाली मी ती विकून टाकले आणि पंधरा लाख मिळाले म्हणजे पाच लाखांनी माझे income वाढले liquidity वाढली bank balance वाढला पण देशासाठी काही संपत्ती निर्माण झाली का? बर संपत्ती निर्माण न करणारे अर्थ धोरण असेल तर देशाचा विकास होणे शक्य नाही.ह्या दोन गोष्टी अधोरेखित होतात.
आताच्या आर्थिक क्षेत्राचा परिणाम म्हणून आपल्याला जर असे विकासाचे धोरण हवे असेल तर स्वाभाविकपणे संपत्ती निर्माण करणारे आर्थिक चिंतन आणि धोरण असण्याची आवश्यकता आहे. केवळ एक शेअर विकून पैसे आले म्हणजे काय झाले प्लॉट विकून पैसे आले म्हणजे काय झाले दुसर्याकोणाकदचे पैसे माझ्याकडे आले एवढाच झाला ना अर्थ आणि हे कोणाकडे येणार आहेत?आणि कोणाकडून येणार आहेत ज्याच्याकडून येणार आहेत तो कदाचित काळाच्या ओघामध्ये विषमताच निर्माण करणार की नाही?संपत्ती निर्माण न करता केवळ असलेल्या संपत्तीचे redistribution करणारे धोरण हे redistribution सुद्धा नाही आहे हे आपण लक्षात घ्यावे पण मीच जरा बरा शब्द वापरतो. हे काही विकासाचे धोरण असू शकणार नाही.कदाचित welfare चे धोरण असू शकेल. development आणि welfare या दोन गोष्टी हातात हात घालून जायला हव्या असतील म्हणुन कम्युनिझमचा जो विचार केला गेला त्याच्यात आहे त्याचे redistribution fair equitable distribution पण आहे त्याचे ते वाढवण्यासाठी संपत्ती निर्माण करणे आवश्यक आहे हा एक धडा मिळाला.
दुसरा एक धडा आताच्या episode मध्ये मिळालेला दिसतो तो पण इंग्रजीत तिथल्या प्रसिद्धी माध्यमांनी सांगितलेला तो म्हणजे privatisation of profits and socialisation of losses. खुप चांगल्या पद्धतीने चार शब्दात हे मांडले आहे सगळे .भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा त्या प्रकाराच्या अर्थविचारामध्ये स्वातंत्र्य आहे व्यक्तीला स्पर्धा आहे मिळाले तर तुझे आहे कारण तोच असे claim करतो की मी धंदा सुरु केला माझे भांडवल लावले मी जोखीम घेतली आणि कर्ज उभारली मी माझी intellectual ability तिथे लावली माझे maarketing skill लावले माझे innovative mind वापरले, HR चांगल्या पद्धतीने हाताळला आणि नफ़ा झाला तर त्या नफ़्याचा हक्कदार मी आणि मी आणि मी एकटाच आहे. this is privatisation of profits. पण मग जर बाबारे तुला तुझ्या धंद्यात जर नुकसान झाले तर मग शासनाकडे जायचे bailout package मागायचे. हे bailout package म्हणजे काय आहे? म्हणजे sociolisation of losses. आमची कंपन नुकसानीत आली losses आले का? मार्केट च सगळे collapse झालेprofit का झाले because I started this I initialised this, contributed my capital ,employed my skills aand hence we could earn this is mine government has nothing to do with it.आणि जर नुकसान झाले तर आपण म्हणणार बाजारच कोसळला त्याला मी तरी काय करणार आणि आता जर बाजार जर कोसळला असेल तर आमची कंपनी वाचवणे हे शासनाचे दायित्व आहे आणि मग शासनाने मदत द्यावी शासनाने मदत द्यावी ती कुठून तर तुम्ही आम्ही भरलेल्य कर महसुलातून आणि तुम्ही आम्ही भरलेल्या कर महसूलातून त्यांचे नुकसान भरुन द्यायचे म्हणजेच त्यांचा तोटा तुम्ही आणि मी सहन करायचा याला त्यांनी योग्य शब्द वापरला socialisation of losses.
तिसरे Too big is bad because of greed and power कुठलीही संस्था खुप मोठी होणे हे वाईट आहे असे आता लक्षात आले या episode नंतर जरा अधोरेखित झाले. का बर मोठी संस्था ही bad आहे त्याची कारणे दोन because of greed हव्यास लोभ आणि power आणि मोठे झाल्यानंतर जे सत्ताकेंद्र येते त्यामुळे खुप मोठे असणे वाईट आहे. मला वाटते हे मी जे विवेचन करतोय आपण सगळे दीनदयाळजींचे अनेक वेळा अनेक पारायणे केलेली मंडळी आहात. दीनदयाळजींनी जी विकेंद्रीकरण हा विषय मांडला होता.याचाच अर्थ काय too big नसावे म्हणजेच विकेंद्रीकरण दुसरे काय ? ते मुद्दाम हून मी इथे अधोरेखित करतो तिथलीच काय आपल्यासारख्या देशात सुद्धा मानसिकता अशी झालेली होती का आहे का आमचे सगळे आर्थिक धोरण हेच सांगत आले ना ! एक वाक्य जे मी नेहमी quote करतो पुन्हा एकदा ते quote करतो आपल्या banking system बद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील, अर्थमंत्री असतील किंवा आपले अर्थशास्त्रज्ञ असलेले पंतप्रधान असतील काय म्हणत आले आमची Banking system अशी आहे we have too many banks with too few branches आपल्या देशातील बँकेची स्थिती अशी आहे की बँका खुप आहेत बँकांची संख्या खुप आहे पण प्रत्येक बँकेच्या branches मात्र शाखा मात्र खुप कमी आहेत. आणि मग पुढे ते म्हणतात we need आम्हाला काय पाहिजे आमचे धोरण कसे असणार आहे we need too few banks with too many branches to make them world class आम्हाला आता कमी संख्येने बँक पाहिजेत आणि त्यांच्या शाखा खुप विस्तारित पाहिजे कारण असे झाले तर त्या world class होतील. जागतिक दर्जाच्या होतील. म्हणजे संकल्पना काय आहे खुप मोठे झाले की दर्जा ऊंचावतो. अशा दिशेने वाटचाल बँकींग क्षेत्रात झालेली आपल्याला दिसते की नाही दिसते. खाजगी क्षेत्रात तर आहेच पण सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा शासनाने सुद्धा असेच केले आहे की नाही असे नसते तर state bank ची एक सिस्टर कन्सर्न कशाला merge झाली असती आणि दुसरे marge करण्यामागे सरकार का लागले असते.म्हणजे ही मनस्थिती केवळ खाजगी क्षेत्राची आहे असे नाही तर आमच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने विचार सुरु झालेला आहे की काय आणि त्याला आता जे घडले त्यांनी एक speed breaker तरी लागू शकते का? खुप मोठे झाले एक लेहमन ब्रदर बुडाला तर जगभर त्याचे चटके बसले .too big एक LIG बुडायला लागली तर शासनाला घाम फ़ुटला आणि त्याला त्यांनी आपल्या पंखाखाली घेऊन टाकले कोणत्या सरकारने भांदवलशाही असलेल्या सरकारने कोणत्या सरकारने ज्यांनी अख्या जगाला सांगितले disinvestment ज्यांनी अख्या जगाला सांगितले to do the buisiness is not the buisiness of government.अशा सरकारने पंखाखाली घेतले. too big is bad because of greed and because of power खुप मोठे झाले की एक सत्ता येते हातामध्ये आणि ती सत्ता आली की इथे wto चा अभ्यास करणारी काही मंडळी मला जेष्ठ आहेत मला माहित आहेत ज्यावेळा ८६ साली उरुग्वे राऊंड सुरु झाले आणि नवीन नवीन विषय प्रामुख्याने चार ह्याच्या मध्ये आणले शेती सेवा असेल गुंतवणुक असेल आणि intellectual property असेल.४ नवीन विषय त्या उरुग्वे राऊंड मध्ये आणले पुढे ९१ साली डंकेल ड्राफ़्ट मध्ये आणि ९४ च्या wto च्या करारात समाविष्ट झाले हे करायचे drafting कोणी केले आहे हो? यातली बरीचशी कलमे ही अशा मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी केली आहेत.आणि ज्यावेळेला negociations in interministrial conference किंवा otherwise झाली त्या त्या वेळेला ह्या कॉर्पोरेट्स चा संपर्क म्हणजे उलटा शासनाचे प्रतिनिधी तिथे असायाचे negociations ला ते कायम multinational कंपन्यांच्या सीईओंशी संपर्कात असायचे आणि त्यांची consent घेऊन आणि मग तिथली negociations होत असत हे अत्यंत उघड सत्य आहे हे अनेकांनी पुस्तकाच्या स्वरुपात लिहलेले आहे.त्यामुळे because of greed आणि because of power too big is bad आणखी एक लक्षात असे येते की unregulated markets creates imbalances. ज्या बाजारपेठां ज्यांच्यावर कोणाचेच नियमन नाही त्यांनी असमतोल निर्माण होतो मग तो असमतोल अनेक प्रकारचा असु शकतो income disparity असेल wealth disparity असेल regional disparity असेल वगैरे. थोडक्यात हे जर टाळायचे असेल तर आताचे जे अर्थचिंतन आहे त्याचा पुनर्विचार करायला लागेल आणि तो कसा करायला लागेल मला वाटते त्या त्या वेळेला काही काही गोष्टींचा उल्लेख मी करत आलो
ते जर पुन्हा थोडक्यात summerise करायचे असेल तर मला असे वाटते की आताच्या धोरणामध्ये सगळ्यात पहिली आवश्यकता काय असेल असे मला वाटते तर संपत्ती निर्माणावर भर देणारे धोरण असायला हवे.संपत्ती निर्माण केव्हा होऊ शकेल कशी होऊ शकेल ? कुठल्यही अर्थव्यवस्थेमध्ये तीन सेक्टर आहेत primery secto ,secondary sector आणि tertiary sector . primery sector म्हणजे काय? म्हणजे निसर्गापासून जेजे घेता येईल शक्य आहे उदाहरण सांगायचे झाले तर शेती ,पशुपालन किंवा mining खाणकाम निसर्गातून आपण घेतो जे आहे ते घेतो ते primery sector झाले. दुसरे secondary sector म्हणजे उत्पादनाचे क्षेत्र जे निसर्गापासून मिळाले त्याच्यावर प्रक्रिया करायची काही तरी नवीन product निर्माण करायचे ते secondary sector .उदाहरण सांगायचे झाले निसर्गात्न आम्ही गहू घेतला पिकवला आणि गव्हाचा वापर करुन bread बनवला पोळी बनवली खनीज म्हणुन लोखंड काढले iron oar चे steel बनवले हे उत्पादन. तिसरे जे क्षेत्र आहे tertiary क्षेत्र म्हणजेच सेवा क्षेत्र आहे. हे सेवा क्षेत्र म्हणजे ज्याच्यात अनेक प्रकारच्या सेवा primary आणि secondary क्षेत्राला मदत करतील अशा सेवा आहेत. Banking असेल, insurance असेल, education असेल ,health care असेल ,tourism असेल वगैरे. हे सगळे आवश्यकच आहे.पण एक लक्षात ठेवणे आवश्यकच आहे हे क्षेत्र आवश्यक असले तरी supplimentary आहे.it is supplimentary and not sufficient म्हणुन केवळ सेवा क्षेत्रावर भर देऊन अर्थव्यवस्थेची रचना करणे हे विकासाकडे कारण हे सेवा शेवटी कोणासाठी आहे जे आता अमेरिकेत घडले primary आणि secondary क्षेत्राकडे दुर्लक्ष आणि केवळ सेवा क्षेत्रातलेच वित्तीय क्षेत्राकडे अधिक लक्ष्य म्हणून तिथे म्हणतात वित्तीय क्षेत्राने assets निर्माण केले पण ते assets काय होते these assets were created out of thin air. derivatives म्हणजे काय होते? derivatives ह्याचा अर्थ एवढाच होता that document that paper that security which does not have it's own value it derives value from some other assets उदा. derivative inssurenceमग हे aasets निर्माण करुन देशाचा विकास नाही होऊ शकणार कारण ज्या assets पासून तुम्ही value derive केली ते assets जर valueless झाले तर ही पुढील सगळी derivative नावाची assets valueless होते अगदी स्वाभाविक आहे म्हणुन आपल्या आर्थिक धोरणामध्ये मला असे वाटते भारताने काय केले होते गेले चार पाच वर्ष आम्हई ज्या GDP आणि आमचे आता २६ तारखेला बजेट येईल त्यावेळा त्याच्या आधी economic survey येईल. त्या survey मध्ये आमचा GDP किती उत्पन्न किती आणि ह्या प्रत्येकी तीन क्षेत्राचे contribution किती? हेही सांगतात . गेली चार पाच वर्ष आम्ही अभिमानाने सांगत आहोत की एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ५५% हे आम्हाला सेवा क्षेत्रातून मिळत आहे.This is matter of pride for us. आताच्या या पार्श्वभूमीवर मला असे वाटते की सेवा क्षेत्र आवश्यक आहे त्याचे महत्त्व कमी अजिबात मानायचे लेखायचे कारण नाही बोलण्याच्या ओघात असा अर्थ ध्वनीत होऊ नये म्हणुन मी स्पष्ट करतो ते महत्त्वाचेच आहे पण त्यांनी विकास जर साधायचा असेल तर सेवाक्षेत्राने सेवा द्यायची कोणाला? जर उद्योगधंदेच नसतील तर Banks कोणाला finance करतील. जे अमेरिकेत आता घडलेले दिसते banks were flooded with money but there were no barrower at all no takers at all.मग त्यांना कोणाला कर्ज द्यावी लागली housing sector ला कर्ज द्यावी लागली आणि तिथुन subprime crisis निर्माण झाला मला सांगायचा मुद्दा मुळ असा की आपले जे काही धोरण असावे त्याच्यामध्ये संपत्ती निर्माणवर प्राथमिक/secondary या कोअर क्षेत्रावर अधिक भर असावा आणि त्या क्षेत्रांना आवश्यक एवढी service sector ची वृद्धी वाढ ही होत राहाणे आवश्यक ठरेल. दुसरा एक मुद्दा मला जो वाटतो तो म्हणजे संपत्ती निर्माण करताना quantity वर तर भर दिलाच पाहिजे अधिकाधिक संपत्ती निर्माण झालीच पाहिजे. पण ती संपत्ती निर्माण करताना मगाशी उद्दीष्टांमध्ये तिघांची मी उद्दीष्ट आपल्या समोर ठेवली मला असे वाटते
त्याचे जर मला सूत्र रुपाने संकलन करायला विचार केला तर मी असे संकलन करु शकतो मनुष्य आणि समाज सुखी करणे हे पहिले उद्दिष्ट असु शकते मनुष्य व समाज नुसता सुखी करुन चालणार नाही म्हणुन दुसरे उद्दीष्ट असु शकते मनुष्य आणि समाज विकसित करणे. आणि तिसरे सुख पण पाहिजे आणि विकास पण पाहिजे तर तिसरे असे म्हणायला लागेल सुख चिरंतन राहिल असा विकास करणे .हे चिरंतन जर ठेवायचे तर मग मी आता संपत्ती निर्माणावर येतो .चिरंतन केव्हा राहिल? चिरंतन केव्हा राहिल जेव्हा पर्यावरणाकडे लक्ष दिले तर ते चिरंतन राहिल. म्हणजे थोडक्यात नुसते quantity वर संपत्ती निर्माण करायची आणि अधिकाधिक संपत्ती निर्माण केली की आम्ही अधिकाधिक सुखी विकसीत होऊ तर ते कदाचित आज होऊ येणारी काही वर्ष होऊ पण त्यानंतर मात्र त्याच्यात खंड येणार हे निश्चीत आहे.म्हणुन सततची संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेकडे लक्ष देणारे धोरण असावे लागेल. आता जो ताजा विषय होऊन गेला वांग्याचा अगदी त्यापुर्वी बीटी कॉटनचा झाला आणि त्यापूर्वी मोन्सॅटो या कंपनीने आणलेल्या terminating seeds चा विषय होऊन गेला. अधिक उत्पन्न मिळाले पाहिजे त्यासाठी काही genetically modified food आणा किंवा काहीतरी असे बियाणे आणा की प्रचंड उत्पन्न होईल कमी खर्चात होईल बरोबर आहे.त्याच्या तांत्रिक बाबीत आपण जाऊया नको पण quantity वाढेल असा जर कोणी दावा केला पण आपण तो वादासाठी गृहित धरला तर हे खरे आहे का वाढलेली quantity सतत मिळत राहील. ती जमीन तेवढीच सुपीक राहणार नाही वर्ष काही पिढ्या राहील आणि तसे जर नसेल तर हे धोरण आम्हाला राबवून चालणार नाही याला मी पर्यावरणाकडे लक्ष देणारे म्हणतो. चिरंतन सुख आणि विकास म्हणजे production of wealth for a longer period of time. कारण हे सगळे विकास आणि उत्पादन हे cyclical आहे. मला वाटते त्याचा ही दीनदयाळजींच्या वाड्मयात उहापोह आहे.प्रत्येक गोष्ट वेस्ट होऊन चालणार नाही ती वेस्ट झाली की पुन्हा ती recycle होईल. अशा पद्धतीने तिचा वापर व्हायला पाहिजे अणुउर्जेचा विषय आलेला आहे ताजा. अणु वापरुन ऊर्जा निर्माण करणे उर्जा पाहिजे ,उर्जेशिवाय प्रगती होणार नाही सगळ्यांना मान्य आहे पण ही उर्जा आणायची कुठुन? ती जर cyclical source मधून म्हणजे निसर्गात उपलब्ध असणार्या आजच्या स्त्रोतांचा वापर करुन दुर्दैवाने आजकाल त्याला non conventional energy source म्हणतात.मला वाटते ते खरे conventional आहेत. अशांचा वापर करुन म्हणजे काय आज आहे तो स्त्रोत वापरला ऊर्जा निर्माण झाली त्यातून जो waste आला तो पुन्हा cycle झाला त्यातुन पुन्हा काही तरी उपयुक्त असे निघाले. अणुउर्जेने काय होणार आहे..अणुउर्जेत काय होणार आहे. अणु उर्जा निर्माण करताना निर्माण होणारा waste हा recycle होऊ शकतॊ का? किंबहूना तो साठवणे हा सुद्धा एक problem निर्माण झालेला आहे. तो distroy करणे आज तरी लोकांना अशक्यप्राय वाटते आहे. मग अशा स्त्रोतातून आम्ही उर्जा मिळवणे उर्जा आवश्यक आहे विकासाला असे धोरण आम्हाला चालेल का माझ्यादृष्टिने हा दुसरा मुद्दा आहे.
तिसरा संपत्तीचे निर्माण हे कशासाठी उद्दीष्टात आपण म्हटले आहे निर्वाह उपजीविका यासाठी प्रथम आणि व्यापारासाठी नंतर असे धोरण असायला पाहिजे. बरोबर ह्याच्या उलट धोरण आपल्याला चीनचे दिसते का हो?चीनने प्रगती खुप केली असे आपण मानतो जग मानतेपण चीनची सगळी प्रगती कशी झालेली दिसते आपल्याला उत्पादन for export हे कोणाच्या consumption साठी आहे हे मान्य आहे पण त्या देशाच्या विकासाचा जर आपण विचार करायला लागलो तर ते आता म्हणुन त्यांच्या देशामध्ये अधिक प्रॉब्लेम निर्माण झाला. Bailout package जे प्रत्येक देशाने वेगवेगळ्या कारणासाठी दिले तेपण खुप वाचण्यासारखे अभ्यास करण्यासारखे आहे. सगळ्यांनी Bailout package एकाच प्रकारची दिलेली नाहीत. कोणी देशांनी बँका बुडत होत्या त्या वाचवाव्यात म्हणुन बँकांना Bailout packages दिले आहेत पण ती सुद्धा packages वेगवेगळी आहेत.कुणी depositers चे पैसे मिळावेत म्हणुन Bailout package दिले. चीनमध्ये जे Bailout package दिले आहे त Bailout package to create domestic deamand म्हणुन दिले आहे.कारण उत्पादनाच्या सार्या सुविधा आहेत दर्जेदार उत्पादन होते आहे,export quality उत्पादन होते आहे ,at a reduced cost उत्पादन होते आहे.,पण मागणीच नाही उपभोग नाही.मग उत्पादन कशाला? ते उत्पादन उपभोगासाठी नसेल तर असे उत्पादन करण्याची परिस्थिती साधने निर्माण करताना नैसर्गिक साधन संपत्तीचा विनीयोग हा अपव्यय तर होत नाही ना ? म्हणुन संपत्ती निर्माण करणे हे उपजीविकेसाठी प्रथम आणि व्यापारासाठी नंतर असे धोरणात असायला हवे,असे मला वाटते.संपत्तीचे निर्माण आणि वितरण होताना असंतुलन कमी होईल विषमता कमी होईल किंवा आणखी safe म्हणायचे तर नव्याने विषमता निर्माण होणार नाही असे धोरण असावे.
काही आताच्या काळातील उदाहरणे समोर ठेवतॊ म्हणजे समजेल.आम्हाला औद्योगिक विकास पाहिजे म्हणुन आमच्या शासनाने औद्योगिक विकासासाठी काही धोरणे राबवली त्यातले एक धोरण होते special economic zones. विशेष आर्थिक क्षेत्र sez कशी राबवली हो ही? तुम्हाला सगळ्या करातून माफ़ी आहे. SEZ ची सुरवात करा सगळ्या करात माफ़ी डेव्हलपमेंट ला माफ़ी आणि तिथे उभारल्या जाणार्या units ला पण करातून सुट.आवश्यक वाटत असेल तर हे धोरण SEZ म्हणुन स्विकारायचेच असेल तर काय करता असते .कुठे सगळे SEZ एकत्र आलेले दिसतात. देशातल्या सगळ्या SEz पैकी सुमारे ११० पेक्षा जास्ती SEZ (साधारण देशात ७०० च्या आसपास SEZ आहेत ) केवळ महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रातल्या ११० SEZ पैकी कुठे concentrate झालेले आपल्याला दिसतात. मुंबई ,पुणे याच्या आजुबाजुला concentrate दिसतात. मग असे धोरण राबवल्याने विषमता वाढेल की विषमता कमी होईल ?आम्हाला जर का SEZ आवश्यकच आहे असे वाटत असेल समजा आणि एवढया facilities जर आम्ही द्यायला तयार असलो ,समजा तर आम्हाला या SEZ राबवताना असे म्हणता आले असते का ? विदर्भात जा, मराठवाडयात जा तर तुम्हाला या सुविधा मिळतील.सगळ्या प्रकारचे SEZ कदाचित जाणे व्यवहारतः अशक्य असेल पण काही प्रकारचे SEZ तरी तिथे जाऊ शकतात का? असा विचार करता येईल का? उदाहरण सांगायचे झाले तर IT आहे. मी थोडे धाडसाने हे विधान पण पूर्ण जबाबदारीने करतो IT काय लागते काय? एक Broadband सुविधा पाहिजे आणि uninterupted power पाहिजे. बाकी आणखी लागते काय IT ला ? मग हे IT चे उद्योग पुण्याच्या जवळच किंवा मुंबईच्या जवळच असले पाहिजेत हा अट्टाहास कशासाठी ? तिथे employment limited आहे? अतिशय high quality employment मिळते मग SEZ मध्ये तर तेच आहे ना ? ५०% तुम्हाला उत्पादनासंबंधी आहे ५०% residential ,commercial याच्यासाठी आहे जागा? मग तुम्ही develop करताना त्या प्रकारच्या सॉफ़्टवेअर इंजिनीअरसाठी आवश्यक असणारी सगळ्या प्रकारची व्यवस्था त्या ५०% त करु शकता आणि मग ते बंगलोरला जाऊन राहिले काय ? किंवा अमेरिकेत जाऊन राहिले काय किंवा धुळ्यासारख्या एखाद्या अविकसीत भागात जाऊन अत्यंत उत्तम सुविधा असणार्या ठिकाणी राहिले काय ? शासनाला जी सुविधा उपलब्ध करुन द्यायची आहे खर तर SEZ मध्ये ह्या सगळ्या सुविधा developer नी उपलब्ध करायच्या आहे शासनाची जबाबदारीच नाही.पण just to induce की तुम्ही या इथे असे म्हणायचे असेल तर काय करायला पाहिजे मग शासनसुद्धा अशा सुविधा देऊ शकेल आणि ही विषमता कमी करु शकेल हटवू शकेल पण निदानपक्षी नव्याने निर्माण करु शकणार नाही. लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन हा ही एक असाच विषमता संपवण्याचा प्रकार असु शकतो आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता ही सर्वदुर असा ही एक उपाय या विषमता असंतुलन कमी करण्यासाठी असु शकतो.
चिरंतन विकासासाठी शासनाची भुमिका महत्त्वाची आहे हे धोरणामध्ये मला असे वाटते गृहित धरणे आवश्यक आहे. हे आता अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे आताच्या परिस्थिती मध्ये शासनाने withdraw व्हावे याच्यावर सगळीकडे भर दिला जात आहे.म्हणुन मला व्यक्तिशः असे वाटते की शासनाची म्हणजे कोणातरी नियामकाची आव्श्यकता आहे हा नियामक कोण असावा हे आपण ठरवु शकतो. कारण बंधनाशिवाय चिरंतन विकास चिरंतन संपत्तीची निर्मीती without disequilibrium imbalances ही शक्य नाही. कोणाला तरी या नियामकाची भुमिका करावी लागेल आणि जर उदाहरणच देऊन थोडेसे शब्दाचे फ़ुलोरे करुन सांगायचे झाले तर जोपर्यंत तुम्ही शब्दांना वृत्त आणि छंदात बांधत नाही तोपर्यंत कविता होणारच नाही ,जोपर्यंत कवितांना तुम्ही कुठल्यातरी रागात आणि तालात गुंफ़त नाही तोपर्यंत त्याचे संगीत होणारच नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायांच्या आणि हातांच्या हालचालींना बंधने घालत नाही तोपर्यंत नृत्य निर्माणच होणार नाही. जोपर्यंत हवेला काही बंधने घालत नाहि तोपर्यंत त्याच्यावर टायर मध्ये ती भरल्याशिवाय गाडी चालणारच नाही असे एवढेच कशाला ते पाणी सुद्धा नीट बंधनातून सोडए नाही तर सिंचन कसे होणार आहे आणि विवाह बंधनात तुम्ही मी अडकलो नाही तर पशुचा मानव तरी होणार आहे का ? बंधन आहेच.व्यक्तिस्वातंत्र्य just left everything to market and market will take care of everything हा आपल्या धोरणाचा भाग असु शकत नाही असे मला व्यक्तीशः वाटते. त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे असलेल्या तीन गोष्टींचा उल्लेख जरा गांभीर्याने आपण करायला पाहिजे,विचार गांभीर्याने करायला पाहिजे .
आपल्या अर्थव्यवस्थेतील मला वाटते तीन continue करावी अशी वैशिष्टे आहेत.फ़क्त त्याचे स्वरुप त्याचा effectiveness याच्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे. पहिले Planning -- आता ते केंद्र स्तरावर असावे की राज्यस्तरावर असावे की ग्रामस्तरावर असावे तपशीलात जाता येईल,पण planning ची आवश्यकता आहे.धोरणाचा एक भाग म्हणुन दुसरे public sector enterprise and public distribution system.या तीनही आवश्यक असणार्या गोष्टी आहेत .धोरणाचा भाग म्हणुन असे माझे व्यक्तीगत मत आहे आणि हे जर सगळे व्हावे असे वाटले असेल आणि सुरुवातीला आपण एक गोष्ट गृहित धरली आहे की अर्थशास्त्र हे अलग नाही समाजशास्त्र ,राज्यशास्त्र ह्याच्याबरोबर जसे ते हातात हात घालून हे जाणार आहे दीनदयाळजींच्या लेखनात आलेल्याचा उल्लेख करायचा झाला तर सूत्ररुपाने आपण नेहमी असे म्हणतो संयमीत उपभोग हे एक सूत्र मानतो आपण दुसरे सूत्र आपण मानतो की सम्यक वितरण सूत्र आहे पण हे संयमित उपभोग घेणे हे माणसाच्या स्वभावाच्या विरोधातच आहे आणि म्हणुन या संयमित उपभोगासाठी असे काही तरी समोर ध्येय उद्दिष्ट आख्या समाजासमोर ठेवणे आवश्यक राहणार आहे. तो धोरणाचा एक भाग आहे. Psychological भाग आहे. आणि असे जर उद्दीष्ट ठेवले तर माणुस स्वतःच्या अमर्याद उपभोगापासुन अमर्याद उपभोगात लिप्त न होता काहीतरी वर उठून विचार करु शकतो आता हे शक्य आहे का? का केवळ कवि कल्पना आहे ? मला वाटते हे शक्य आहे ह्या भारतात अलिकडच्या काळात झालेले आहे . उदाहरण भारताचे युद्ध झाले लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते आकाशवाणी वरून त्यांनी एक आवाहन केलेले होते आपल्यापैकी अनेकांना ते आठवत असेल मी तर त्यावेळेला खुप कहान होतो. त्यांनी असे म्हटले होते अन्न्धान्याचा अपुरा साठा आपल्याकडे आहे युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे न जाणो युद्ध लांबले तर अन्नधान्याचा साठा कमी पडु शकतो म्हणुन मी सगळ्या देशवासीयांना आव्हान करतॊ तुम्ही आठवडयातला एक दिवस संध्याकाळचे जेवण करु नका. एक मोठे लक्ष्य सगळ्या समाजासमोर ठेवले आणि समाजाने त्याला काय response दिला होता हा आपण सगळ्यांनि अनुभवलाय. हा उपभोग मर्यादित करण्याचाच मार्ग आहे की नाही? माझ्या व्यक्तिगत सुखापेक्षा आणखीन काही तरी मोठे असे माणसाच्या समोर ठेवले गेले त्याला मग नाव काही द्या पंडीतजींनी त्याला धर्म आणि मोक्ष असे नाव दिले असेल.पण काहीतरी मोठे उद्दीष्ट समोर ठेवल्याशिवाय हे घडणे शक्य नाही.म्हणुन मर्यादित उपभोग हे ज्यावेळेला आपण म्हणतो तेव्हा धोरणाचा एक अविभाज्य भाग असा असला पाहिजे की मला माझ्या व्यक्तीगत उपभोगाच्या पेक्षा अधिक काहीतरी करण्याची आस लागेल असे काहीतरी ह्या धोरणात असणे आवश्यक आहे.
आपल्याकडे रचनाच मला वाटते जी आहे समाजाची ती घडी विस्कटली म्हणुन कदाचित असे झाले असेल की उपभोग अमर्याद सुरु झाला. एक फ़क्त उदाहरण सांगतो आणि पुढे जातो .आमच्या समाजात अशी व्यवस्था होती त्याला आपण म्हणतो चार आश्रम. बघाबर उपभोग मर्यादित करण्याचेच साधन होते का?ब्रह्मचर्याश्रम आहे म्हणजे काही गोष्टींचा उपभोग घ्यायचाच नाही आहे तुला? वानप्रस्थाश्रम ,संन्यासाश्रम आहे .नाही घ्यायचा उपभोग. अहो गृहस्थाश्रम आहे काय होते गृहस्थाश्रमात माझ्याकडे मी गृहस्थी आहे आणि माझ्याकडे एखादा मेहमान आला ,पाहुणा आला तर काय होते? अतिथी देवॊ भव .माझ्याकडे किती आहे महत्त्वाचे नाही ,मला पोटभर आहे की नाही महत्त्वाचे नाही.आलेला भुकेला असेल तर त्याला आधी जेवऊ घातले पाहिजे. होते ना उपभोगाच्या वैयक्तिक सुखस्वार्थाच्या पलिकडे जाणारे ? होते आमच्याकडे अगदी आता आता पर्यंत आहे. मी तर गेली तीस वर्षे शिकवलेय अनेक विद्यार्थी पास झालेले पहिले आलेले मी पाहिलेत थोडेसे संघाचे काम पण लहानपणापासून करतोय. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांपैकी अनेकवेळा जाण्याचा प्रसंग मला आलेला आहे ,येतोय. मी असे कित्येक वेळेला बघितलेय की हा पहिला आलेला विद्यार्थी अशा घरामध्ये असतो की तुम्ही गेल्यानंतर केवळ चार पेढे विकत आणु शकतो .पण तो आणतो आणि तुम्हाला देतो कशातून आले असेल हो हे. तो काही नफ़्याने प्रेरित झालेला आर्थिक माणूस नाही. आजच्या अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायाचे झाले तर तो पण तसाच आहे पण तरी त्याला वाटते माझे सर आले आहेत.त्यांना दिले पाहिजे .काहीतरी मोठे समोर ठेवणे हे ही त्या धोरणाचा भाग असला पाहिजे. आमच्याकडॆ ती व्यवस्था होती ती व्यवस्था कालानुरुप बदलणे आवश्यक आहे. पण अशी व्यवस्था असणे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर कमाल आणि किमान संपत्ती आणि उत्पन्न याचे काही मापदंड ठरवणारे धोरण हवे असे म्हणतात.आमच्याकडे आहे मनुस्मृतीत सांगितले आहे असे म्हणतात. मी जे वाचलएय त्याच्यात असे आहे की वैश्य असेल त्याला येणार्या दहा वर्षाच्या त्याच्या उपजीविकेसाठी जेवढे आवश्यक आहे तेवढे संग्रह करण्याचा अधिकार आहे.This is upper limit ,ceiling limit. संपत्ती किती साठवायची तर दहा वर्षे हे मनुने सांगितले कदाचित त्या सोसायटीत असेल.धोरणात्मक भाग म्हणुन काय असले पाहिजे कमाल आणि किमान पगार एखाद्याला दोन डॉलर /एक डॉलर न मिळणारी पन्नास, साठ टक्के जनता आपल्या देशामध्ये आहे आणि चौसष्ट कोटी डॉलर्स मिळणारी आमच्याकडे आहेत ना? अंबानींची दोन्ही मुले ३२/३२ कोटी दरवर्षाला घेतात. कमाल आणि किमान याच्यासाठी काहीतरी मापदंड असला पाहिजे अशी व्यवस्था असणे आवश्यक आहे असे मला वाटते याचबरोबर एक आणखीन जो विषय आपल्याला सुरवातीला जो मी मांडला वृद्धस्य तीर्थेषु प्रतिपादिनि ... जे आम्ही वाढवले असे आमचे जे काही आहे कसे वापारावे सांगण्यासाठी सुद्धा काहीतरी धोरणात असले पाहिजे. काय असु शकते मला असे वाटते मी जरा विदेशातील उदाहरणे दिली तर आपल्याला कदाचित बिल गेट ने काय केले? केलान एक ट्रस्ट आणि आपली भली मोठी संपत्ती, भला मोठा शेअर त्या ट्रस्टला देऊन टाकला.वारन बफ़ेट ने काय केले? त्या ट्रस्ट्ला आपली २/३ संपत्ती देऊन टाकली.नारायणमूर्तींनी काय केले? टाटांनी काय केले? बघा वृद्धस्य आम्ही जे वाढविले आहे अहो त्या फ़ोर्ब्सच्या यादीत कधीही टाटांचे नाव नाही दिसत.का बर टाटा गरीब आहेत? टाटांची सगळी investment ही शेअर्स ही टाटा सन्स या ट्रस्ट मध्ये आहे. काय होतो याचा परिणाम? आमचे सामाजिक दायित्व जे काही आहे ते कुठेतरी लक्षात ज्यांच्या आले ते त्याप्रमाणे केले ते धोरणात असू शकते का?हा ही एक विचार करता येईल.कारं असंतुलन जेव्हा काढून टाकावे असे आपण म्हणतो तेव्हा आजच्या विचारधारेमध्ये तीन मार्ग सांगितले जातात.पहिला मार्ग आहे सक्तीने संपत्ती काढून घ्या. दुसरा मार्ग आहे कर आकारून संपत्ती काढून घ्या. मला असे वाटते आपल्या धोरणामध्ये volentary contribution of wealth असे काही असु शकते का? आणि आताची ताजी दोन उदाहरणे सांगतो आणि मी थांबतो
स्वाध्याय नावाचा एक परिवार आहे. आणि पांडूरंगशास्त्री आठवल्यांनी काही प्रयोग केलेले आहेत.त्या प्रयोगावरचे एक छोटेशी पुस्तक आम्ही Thnkline मध्ये प्रकाशित केली आहे. त्यातले दोन प्रयोग एक योगेश्वर कृषी हा एक प्रयोग आहे. आणि दुसरा मत्स्यगंधा हा दुसरा प्रयोग आहे. काय आहे योगेश्वर कृषी म्हणजे? ज्यागावामध्ये स्वाध्यायी चाळीस टक्के आहेत तपशील आपण सोडून देऊ या. त्यांचे म्हणणे काय की ह्या गावामधल्या गावातल्या लोकांनी ज्यांच्याकडे भरपुर जमीन आहे.अशांनी turn by turn , २१ वर्ष, १३ वर्ष ,४ वर्ष जी शक्यता असलेल्या प्रमाणे विनोबाजींसारखे भुदान नाही ,ती जमीन गावाला वापरायला द्यायची. बाकीची शेती त्याची त्याची करायची ही जमीन गावाची शेतजमीन म्हणुन राहील आणि गावकर्यांनी त्या शेतजमिनीवर वर्षातून दोन दिवस काम करायचे. प्रत्येकाने आणि त्याच्यातून जी संपत्ती निर्माण होईल ती पन्नास टक्के ह्याच गावात ठेवून द्यायची. पन्नास टक्के त्यांनी एक सेंट्रक कोष केलाय तिथे पाठवायची. आणि गावात कोणी भुका राहु नये म्हणुन त्या संपत्तीचे वितरण गावातल्या लोकांनी करायचे आहे. जपजाप्य करा करु नका पण हे काम करा. आणि त्याला त्यांनी impersonal wealth असे नाव दिले. आजच्या घडीला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये दहा हजार पेक्षा जास्त गावी योगेश्वर कृषी चालू आहे. मोठे ध्येय ठेवणे म्हणजे काय याचे हे छोटे उदाहरण आहे.मत्स्यगंधा असाच एक प्रकल्प त्यांनी मांडला कोळी लोक आहेत आणि कोळ्यांना असे वाटले एकादशी करावी. ते गेले दादांकडे दादांनी त्यांना सांगितले एकादशी म्हणजे उपास असे काही करायला पाहिजे अशी आवश्यकता नाही. तुम्ही असे करा वर्षभर एकादशीच्या दिवशी जे तुम्हाला उत्पन्न मिळेल त्यातला दहा टक्के हिस्सा सार्यांनी एकत्र करून गावात ठेवा हीच तुमची एकादशी .त्यांनी पैसे गोळा केले आणि वर्षभरानंतर दादांकडे घेऊन गेले. दादांना सांगितले की हे पैसे आणलेत घ्या दादा म्हणाले मला काय करायचेत. यातून एक बोट खरेदी करा आणि ती बॊट तुम्ही वर्षभर वापरा. तुम्ही जेवढे कोळी बांधव आहात प्रत्येकाने एक दिवस ही बोट चालवायची.वर्षातून एकदा बाकी इतर दिवशी तुमची तुमची बोट चालवा आणि ही बोट चालवून जे उत्पन्न येईल ते उत्पन्न तुम्ही गावात ठेवा.आणि गावात ज्याला गरज असते त्याला ते उत्पन्न तुम्ही द्या.impersonal wealth created by villagers. मोठे असे काही तरी ठेवणे म्हणजे काय असु शकते आणि हे शक्य आहे की नाही म्हणुन मी दोन प्रयोग आपल्यासमोर ठेवले. माझ्यापरीने मी विवेचन केले आहे.
Friday, June 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment